पोटाच्या समस्यांवरही आराम देण्याचे काम कोबी करतो. यामुळे पचनशक्ती वाढते आणि पोटदुखी दूर होते. पोटातील जंतांची समस्याही याच्या सेवनाने दूर होते.
ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी आहारात कोबीचा समावेश करावा.
कोबीमध्ये लोह आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. अशा परिस्थितीत ते शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते, तसेच रक्त देखील शुद्ध करते. पोटॅशियम हा घटक रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
जर, तुम्हाला सतत स्नायू दुखीचा त्रास होत असेल, तर कोबी तुम्हाला या समस्येपासून आराम देऊ शकतो. त्यात लॅक्टिक अॅसिड नावाचा घटक असतो, जो स्वतः नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करतो.
कोबीमध्ये पॉलिफेनोल्सचा एक घटक असतो, जो हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतो. कोबी शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी देखील नियंत्रित करू शकतो.
कोबी हा व्हिटॅमीन ‘के’चा उत्तम स्त्रोत आहे. व्हिटॅमीन ‘के’ मेंदूच्या नसांचे आरोग्य सुधारतो.
त्यामुळे कोबीचे सेवन तुमच्या मेंदूलाही सक्रिय ठेवतो.
पोटातील जंतांची समस्याही याच्या सेवनाने दूर होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.