बॉलिवूड चित्रपट 83 प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या चित्रपटात सगळ्यांच्याच भूमिका एकापेक्षा एक होत्या.
अभिनेता आदिनाथ कोठारेने 83 या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला.
आता लवकरच तो दिग्दर्शक रमेश सिप्पीच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.
त्यामुळे आदिनाथ आता आणखी कोणत्या नव्या चित्रपटात दिसणार याबाबत चाहते उत्सुक आहेत.
रिपोर्टसनुसार, काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर आदिनाथचा बॉलिवूड दिग्दर्शक रोहन सिप्पीबरोबर (Rohan Sippy) फोटो दिसला. या फोटोने चाहत्यांची उत्सुकता मात्र जास्तच वाढवली आहे.
या संदर्भात आदिनाथ कोठारेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. आदिनाथ म्हणाला, होय, मी रोहन सिप्पीच्या नव्या प्रोजेक्टमध्ये तुम्हांला दिसेन.
रोहन सिप्पी माझ्या आवडत्या बॉलिवूड दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्यामुळे रोहन सिप्पीच्या प्रोजेक्टचा हिस्सा होणं,
नक्कीच सुखद म्हणावे लागेल. सध्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. यंदा हे प्रोजेक्ट रसिकांच्या भेटीला येईल.”