विश्व सुंदरी असलेली मानुषी छिल्लरने मालदीवमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मानुषी छिल्लर या फोटोमध्ये रेड बिकिनी मध्ये दिसतीये. मालदीवमधील तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत. विश्व सुंदरी मानुषी छिल्लर सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. मानुषीचा जन्म हरियाणातील रोहतक जिल्ह्यात झाला होता. त्यानंतर तिचं कुटुंब हरियाणातून दिल्लीला शिफ्ट झालं. मानुषीने दिल्लीतील सेंट थॉमस शाळेमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. मानुषी छिल्लरने मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यापूर्वी 2000 मध्ये प्रियांका चोप्राने हा किताब पटकावला होता. मिस वर्ल्ड झाल्यानंतर मानुषी अनेक इव्हेंट्समध्ये सहभागी झाली होती.