71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा (Miss World 2023) ही काश्मीरमध्ये होणार आहे.



मंगळवारी (29 ऑगस्ट) श्रीनगरमध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.



या पत्रकार परिषदेमध्ये मिस वर्ल्ड 2023 या स्पर्धेबाबत चर्चा करण्यात आली.



जवळपास 140 देशांमधील स्पर्धक हे मिस वर्ल्ड 2023 या स्पर्धेक सहभागी होणार आहेत.



पत्रकार परिषदेत मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलाव्स्की, मिस इंडिया सिनी शेट्टी, मिस वर्ल्ड कॅरिबियनएमी पेना आणि मिस वर्ल्ड इंग्लंड जेसिका गगेन आणि मिस वर्ल्ड अमेरिका श्री सैनी आणि मिस एशिया प्रिसिलिया कार्ला सपुत्री युलेस या उपस्थित होत्या.



कॅरोलिना बिलाव्स्कीनं पत्रकार परिषदेत सांगितलं,“काश्मीर हे मिस वर्ल्डसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे सर्व काही आहे. भारतातील हे सुंदर ठिकाण आणि येथील सुंदर तलाव मी पाहिले. सर्वांनी आमचे छान स्वागत केले.



'येथे आम्हाला मिळालेला पाहुणचार अप्रतिम होता. या स्पर्धेत 140 देश सहभागी होताना पाहणे हे रोमांचकारी ठरेल. प्रत्येक ठिकाणाचे स्वतःचे सौंदर्य असते. परंतु येथील सुखद आदरातिथ्य जबरदस्त आहे.' असं कॅरोलिना बिलाव्स्कीनं पत्रकार परिषदेत सांगितलं.



मिस इंडिया सिनी शेट्टी पत्रकार परिषदेत म्हणाली, “मिस वर्ल्ड 2023 काश्मीरमध्ये होणार आहे हा अभिमानाचा क्षण आहे. हा क्षण दिवाळी सणासारखा असेल कारण 140 देश भारतात येत आहेत आणि एक कुटुंब म्हणून स्पर्धेत सहभागी होत आहेत.”



रुबल नागी आर्ट फाऊंडेशनचे रुबल नागी आणि भारतातील पीएमई एंटरटेनमेंटचे अध्यक्ष जमील सैदी हेही या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.



जवळपास तीन दशकांनंतर मिस वर्ल्ड स्पर्धे या स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी भारताकडे देण्यात आली आहे. 1996 मध्ये भारतामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.