अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक आहे.



नवाजुद्दीन हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो.



नवाजुद्दीन हा 'सेक्शन 108' या एका सस्पेन्स ड्रामा फिल्ममधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



'सेक्शन 108' या चित्रपटाच्या टीझर लॉन्चच्या कार्यक्रमाच्या वेळी, नवाजुद्दीननं सांगितलं की, 'मी माझ्या स्क्रिप्ट निवडताना खूप काळजी घेईन'



सेक्शन 108 या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीनं सांगितलं, '2024 मध्ये काय होईल? हे मला माहीत नाही. पण हो, मी माझ्या स्क्रिप्ट निवडताना खूप काळजी घेईन.'



पुढे तो म्हणाला, 'माझे काही प्रयोग मी ठरल्याप्रमाणे झाले नाहीत. म्हणून आता हुशारीने स्क्रिप्ट्स निवडेन. मी आता फक्त चांगले चित्रपट करण्याचा प्रयत्न करेन.'



सेक्शन 108 या चित्रपटाबद्दल ते म्हणाले: ही एक अप्रतिम कथा आहे. चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा खूप मनोरंजक आहे.



गँग ऑफ वासेपूर, मंटो, बजरंगी भाईजान या नवाजुद्दीनच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.



सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील नवाजुद्दीनच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं होतं.



आता नवाजुद्दीनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



Thanks for Reading. UP NEXT

रक्षाबंधनाला करा 'या' बॉलिवूड अभिनेत्रींसारखा लूक

View next story