मॉडेल सिएना वीरचं वयाच्या 23 व्या वर्षी निधन झालं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये घोडेस्वारी करताना सिएना वीरचा अपघात झाला होता. अपघातानंतर सिएना वीरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान सिएना वीरची प्राणज्योत मालवली आहे. 'मिस युनिव्हर्स 2022' या स्पर्धेत सिएना शेवटच्या टप्प्यात पोहोचली होती. सिएनाने सिडनीच्या विद्यापीठातून तिने इंग्रजी साहित्य आणि मनोविज्ञान या विषयांत पदवीचं शिक्षण घेतलं आहे. सिएना मॉडेलिंग क्षेत्रात नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असे. सिएनाच्या मृत्यूनंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मॉडेल्समध्ये सिएनाची गणना होते. सिएना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे.