देशात एका दिवसात कोरोनाचे 1 हजार 54 नवीन रुग्ण आढळले असून 29 जणांचा मृत्यू झाला आहे देशात आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 4 कोटी 30 लाख 35 हजार 271 इतकी झाली आहे देशातील कोरोनाबळींची संख्या 5 लाख 21 हजार 685 झाली आहे सध्या देशात कोरोना विषाणूवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 11 हजार 132 वर पोहोचली आहे गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 233 ने कमी झाली आहे देशातील रुग्णांच्या बरे होण्याचा दर 98.76 टक्के इतका आहे देशात कोरोना रुग्णांचा दैनंदिन संसर्ग दर 0.25 टक्के आणि साप्ताहिक संसर्ग दर 0.23 टक्के आहे देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 25 लाख 2 हजार 454 लोक संसर्गमुक्त झाले आहेत कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.21 टक्के आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 185 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत