राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या मातोश्री इंदिराबाई बाबाराव कडु यांचे शनिवारी दुपारी 12.45 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 84 वर्षाचे होते. त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या बेलोरा येथील निवासस्थानावरुन निघणार आहे. इंदिराबाईं कडू यांच्या जाण्याने त्यांच्या जीवनाला वळण देणारी मायेची ज्योत मालवल्याची प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चु कडु यांनी दिली समाजसेवा आणि रुग्णसेवा यांसारख्या कर्माला खऱ्या अर्थाने वास्तवात उतरविण्यास बच्चू कडूंना त्यांच्या आईनेच चालना दिली. सामान्य माणसावरील अन्याय विरोधात लढण्याची प्रेरणा या मायनेच दिली. वेळ प्रसंगी बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी होण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. अखेरचा श्वास असेपर्यंत शेतकऱ्यासाठी लढ असा आदेशच इंदिराबाईंनी बच्चु कडू यांना दिला होता