बॉलिवूडच्या देसी गर्लचा आता परदेशातही दबदबा आहे. प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्येही सक्रिय झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रियांका चोप्रा एका चित्रपटासाठी 15-25 कोटी रुपये मानधन घेते.
बॉलिवूडची 'पंगा क्वीन' कंगना रनौतने तिच्या दमदार अभिनयासाठी चार राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. ‘थलायवी’ या चित्रपटासाठी कंगना रनौतने 27 कोटी रुपये घेतले होते.
दीपिका लवकरच शाहरुख खानसोबत ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका एका चित्रपटासाठी 15-30 कोटी रुपये घेते.
कतरिना कैफ लवकरच ‘टायगर 3’मध्ये सलमान खानसोबत दिसणार आहे. कतरिना या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ एका चित्रपटासाठी 15-25 कोटी रुपये घेते.
करीना कपूर-खानची गणना बॉलिवूडच्या बिग बजेट स्टार्समध्ये केली जाते. करीना एका चित्रपटासाठी 12 कोटी रुपये मानधन घेते.
आलिया भट्टने आपल्या सर्वोत्तम अभिनयाने फार कमी वेळात स्वत:साठी एक मोठे स्थान निर्माण केले आहे. सध्या ‘गंगूबाई काठियावाडी’मुळे चर्चेत असलेली आलिया एका चित्रपटासाठी जवळपास 23 कोटी रुपये मानधन घेते.
अनुष्का शर्मा लवकरच ‘चकदा एक्सप्रेस’ या बायोपिकमध्ये दिसणार आहे. अनुष्का शर्मा एका चित्रपटासाठी 7 ते 10 कोटी रुपये मानधन घेते.