जगभरात लोक नव्या वर्षाच्या स्वागत करण्यात दंग आहेत मात्र, कोरोनाचं संकट अद्यापही कायम आहे.



दुसरीकडे ओमायक्रॉन व्हेरियंटनेही 24 देशांमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केलीय.



अशात आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. 2022 या नव्या वर्षात कोरोना महामारी संपेल असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटलं आहे.



जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, जगातील सर्व देशाच्या सरकारने कोरोना महामारी संपवण्यासाठी मिळून काम केले पाहिजे.



गेब्रेयसस यांनी सांगितले की, 2021 वर्षात कोरोनामुळे 33 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे.



एचआयव्ही, मलेरिया आणि क्षयरोगामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपेक्षा हे प्रमाण अधिक आहे.



सध्याही दर आठवड्याला सुमारे 50 हजार लोकांचा मृत्यू होत आहे. याशिवाय अनेकांच्या मृत्यूची नोंद नाही.