देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने
बुधवारी (18 जानेवारी) तब्बल 17 हजार गाड्या परत बोलवल्या आहेत.
काही गाड्यांच्या एयरबॅग कंट्रोलरमध्ये बिघाड झाल्याने
या गाड्या परत बोलवल्याची माहिती समोर आलेली आहे.
रॉयटर्सच्या माहितीनुसार, परत मागवण्यात आलेल्या गाड्यांच्या एअरबॅगमध्ये काही दोष आहेत.
हे सुधारण्यासाठी कंपनीने गाड्या परत बोलावल्या आहेत.
या कारचे उत्पादन 8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान झाले.
परत बोलवलेल्या गाड्या दुरुस्त करण्यात येणार आहेत.
मारुती सुझुकीने एकूण 17,362 गाड्या परत बोलवल्या आहेत.
मारुती सुझुकीने या गाड्या न चालवण्याचा सल्ला देखील दिला आहे.