मारुती सुझुकीने अलीकडेच नवीन ब्रेझा लॉन्च केली होती. कंपनीच्या या कारला ग्राहकांनी मोठी पसंती दर्शवली आहे. लॉन्च झाल्यापासून देशात या कारला मोठी मागणी आहे. सप्टेंबरमध्ये या कारची 15,445 युनिट्स विकली गेली. गेल्या महिन्यात ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली होती. या कारसाठी ग्राहकांना 30 आठवड्यांपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागेल.