दरवर्षी 7 जून रोजी 'जागतिक अन्न सुरक्षा दिन' म्हणजेच (World Food Safety Day) जगभरात साजरा केला जातो.



हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना अन्न सुरक्षेबाबत जागरूक करणे हा आहे.



खराब झालेले आणि दूषित अन्न खाल्ल्याने दरवर्षी हजारो लोक आजारी पडतात. परिणामी गंभीर आजारांना बळी पडतात.



WHO च्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर दरवर्षी प्रत्येक 10 पैकी एक व्यक्ती अन्नजन्य आजारांनी ग्रस्त आहे.



यासाठी काहीही खाण्यापूर्वी हात चांगले धुवावेत. भाज्या, चिकन, मांस, धान्ये इत्यादी व्यवस्थित स्वच्छ धुवून खा.



कमी शिजलेले अन्न खाऊ नये. अन्न नेहमी नीट शिजवा आणि तेच खा. अशाप्रकारे जीवाणू नष्ट करतात.



कच्चे आणि शिजवलेले पदार्थ नेहमी वेगळे ठेवा. शिजवलेले अन्न कच्च्या पदार्थांसोबत ठेवू नये कारण त्यात बॅक्टेरिया फार लवकर वाढतात, त्यामुळे शिजवलेले अन्न खराब होऊ शकते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.