अभिनेत्री स्पृहा जोशी लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका, संवेदनशील कवयित्री म्हणून स्पृहा जोशी ओळखली जाते. छोट्या पडद्यावरच्या अनेक भूमिकांमधून स्पृहा घराघरांत पोहोचली. नववर्षाच्या सुरवातीला स्पृहाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. जे शेअर करताना तिने लिहलंय 'Heal, Learn, Grow, Love 💜' स्पृहाने या फोटोंमध्ये जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसतोय, ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. (Photo Credit : @spruhavarad/Instagram)