अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

प्राजक्ता आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

आता देखील प्राजक्ताने काही फोटो पोस्ट केले आहे. परंतु, या फोटोंसाठी दिलेल्या ओळींवरून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

प्राजक्ताने हे फोटो लंडनमधून शेअर केले आहेत. त्यात तिने भारताची खूप आठवण येत असल्याचे म्हटले आहे.

या पोस्टवरून काहींनी प्राजक्ताचे कौतुक केले आहे. परंतु, काहींनी तिला ट्रोल केलंय.

प्राजक्ता सध्या लंडनमध्ये तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी गेली आहे. तेथून ती आपले नवे अपडेट्स शेअर करत आहे.

लंडनमधून शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिला भारताची किती आठवण येत आहे, लंडनमध्ये किती मरगळ आहे यासह अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.

प्राजक्ताचे देशप्रेम पाहून काही जणांनी तिचे कौतुक केले आहे.

प्राजक्ताच्या पोस्टला आलेल्या कमेंट्समध्ये तिला ट्रोल करणाऱ्याच कमेंट्स जास्त आहेत.

प्राजक्ताने केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये अनेक चुका आहेत. या चुकांसह ती दुपट्टी भूमिका घेत असल्याचे नेटकऱ्यांचे मत आहे.