अभिनेत्री पुजा सावंत सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तिला भटकंतीची आवड असल्यानं ती विविध ठिकाणचे फोटोही पोस्ट करते. आताही तिने काही नवे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो इंग्लंडमधील असल्याचं कॅप्शनवरुन दिसून येतं. तिच्या सर्व फोटोंना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक केलं आहे. पुजाचे लंडन ब्रीजवरील फोटोही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. चाहत्यांना पुजाच्या सर्व स्टाईल आवडतात ती देखील विविध लूकमध्ये फोटो काढत असते. वेस्टर्न लूकसह ती साडीत देखील फोटो पोस्ट करत असते.