दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपनं कन्नड, तमिळ आणि हिंदी भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे.


सध्या किच्चा सुदीप हा विक्रांत रोणा या चित्रपटामुळे चर्चेत आहे.


एका मुलाखतीमध्ये किच्चा सुगदीपनं सांगितलं की, एका गावामधील प्रत्येक घरात त्याची पूजा केली जाते.


एका मुलाखतीमध्ये किच्चा सुदीपला विचारण्यात आलं की, तुझ्यासाठी आत्तापर्यंत फॅननं केलेली सर्वात क्रेझी गोष्ट कोणती?'

या प्रश्नाचं उत्तर देत किच्चा सुदीप म्हणाला, 'एका चाहत्यानं पूर्ण शरीरावर माझ्या नावाचा आणि फोटोचा टॅटू काढला होता.'



' पुढे तो म्हणाला, 'एक कुटुंब हे 15 दिवस चालत प्रवास करुन मला भेटण्यासाठी आले होते. ते माझ्याकडून कोणतीही मदत घेण्यासाठी नाही तरी फक्त मला भेटायला आले होते. मी बराच वेळ त्यांच्यासोबत घालवला. त्यानंतर मी त्यांना तिकीट काढून दिले आणि सांगितले की, पुन्हा असं करु नका. '



म्हणाला, 'मी पर्फेक्ट नाहीये. मी चुका देखील करतो. काही लोकांनी माझं मंदिर देखील बांधलं आहे. एक असं गाव आहे ज्यामधील प्रत्येक घरात माझा फोटो आहे. या फोटोची लोक पूजा करतात. पण मला या सर्व गोष्टींची भिती वाटते.'



किच्चा सुदीपच्या विक्रांत रोणा या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.




विक्रांत रोणा चित्रपटामध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.


विक्रांत रोणा हा चित्रपट चित्रपट इंग्रजी, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.