बिग बॉस मराठी पर्वाच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे हिने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मेघाने भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी अभिनेत्री प्रिया बेर्डे यावेळी उपस्थित होत्या. मेघा तिच्या सहज सुंदर अभिनयामुळे कायमच चर्चेत असते. बिग बॉसच्या घरामध्ये मेघाने तिच्या खेळामुळे चाहत्यांची मनं जिंकून घेतली. त्यामुळे बिग बॉसच्या पहिल्या पर्वाच्या विजेतेपदावर मेघाने आपलं नाव लिहिलं. याआधी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मराठी कलाकारांचा सध्या राजकारणाकडे कल वाढल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. अभिनेत्री मेघा धाडे सोबत अभिनेता सौरभ गोखले याने देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.