'खतरों के खिलाडी 13' हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे.
आता या कार्यक्रमासंदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे.
जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अब्दूने 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
आता अब्दू या कार्यक्रमात दिसणार असल्याने चाहते आनंदी झाले आहेत.
'बिग बॉस 16' या कार्यक्रमात शिव ठाकरे आणि अब्दू रोझिक एकत्र झळकले होते.
त्यांची मैत्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली
आता पुन्हा एकदा त्यांच्या जोडीची कमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
शिव ठाकरे आणि अब्दू रोझिकला 'खतरों के खिलाडी 13'मध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
शिवने इंस्टा स्टोरीवर अब्दूसोबतचा फोटो शेअर केला आहे.