अभिनेत्री मनीषा कोयरालाचा आज वाढदिवस आहे.



मनीषा ही 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.



मनीषा ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. मनीषाचा जन्म 16 ऑगस्ट 1970 मध्ये नेपाळमधील काठमांडू येथे झाला.



मनीषाचे वडील प्रकाश कोयराला हे कॅबिनेट मंत्री होते. मनीषाच्या आईचं नाव सुषमा कोयराला आहे.



1989 मध्ये रिलीज झालेल्या फेरी भेटौला या चित्रपटामधून मनीषानं करिअरला सुरुवात केली. तिनं सलमान, शाहरुख, आमिर, गोविंदा, संजय दत्त यांसारख्या कलाकारांसोबत काम केलं आहे.



मनीषाच्या आयुष्यात बरेच चढ- उतार आले.



1991 मध्ये रिलीज झालेल्या सौदागर या चित्रपटामधून मनीषानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.



अकेले हम अकेले तुम, अग्निसाक्षी, बॉम्बे, खामोशी, दिल से आणि मन यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये मनीषानं काम केलं.



मनीषाचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं जात होतं पण मनीषानं बिझनेसमॅन सम्राट दहलसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये मनीषानं सम्राटसोबत लग्नगाठ बांधली.2012 मध्ये सम्राट आणि मनीषा यांचा घटस्फोट झाला.



2012 मध्ये मनीषाची तब्येत बिघडली. त्यानंतर तिला मुंबईमधील जसलोक या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथं तिला कळालं की तिला गर्भाशयाच्या कॅन्सरची लागण झाली आहे.