कोरोना संसर्गाचा धोका कायम असून पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या 12 हजार 249 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे मंगळवारी दिवसभरात 13 रुग्णांचा मृत्यू झाला सोमवारी देशात 9923 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 17 रुग्णांचा मृत्यू झाला एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा चढता आलेख पाहायला मिळत आहे देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकतेचा दर वाढून 3.94 टक्क्यांवर पोहोचला आहे मागील 24 तासांत 9 हजार 862 हजार रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे