तब्बल 24 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील देशातील सर्वांत जुन्या काँग्रेस पक्षाला अखेर 'सरसेनापती' मिळाला आहे



ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरुर यांचा एकतर्फी पराभव करत काँग्रेस अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत



काँग्रेस अध्यक्षपदासाठी 9 हजार 800 जणांनी मतदान केले होते. खर्गे यांना 7 हजार 897 मते पडली



विरोधी शशीर थरुर यांना 1072 हजार मते मिळाली. थरूर यांनी पराभवाचा स्वीकार करत खर्गे यांना शुभेच्छा दिल्या



काँग्रेसचे नूतन अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा जन्म कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील वरवट्टी भागात एका शेतकरी कुटुंबात झाला



गुलबर्गा येथील नूतन विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर येथील शासकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली



येथे ते विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीसही होते



गुलबर्ग्याच्या सेठ शंकरलाल लाहोटी लॉ कॉलेजमधून एलएलबी केल्यानंतर त्यांनी कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली



1969 मध्ये ते MKS मील्स एम्प्लॉईज युनियनचे कायदेशीर सल्लागार बनले. त्यानंतर त्यांनी कामगारांसाठी लढा दिला



ते युनायटेड ट्रेड युनियनचे प्रभावी नेते होते.



1969 मध्येच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला



त्यांची लोकप्रियता पाहून पक्षाने त्यांना गुलबर्गा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केले



1972 मध्ये ते पहिल्यांदा कर्नाटकातील गुरुमितकल विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले