रमजान महिन्याच्या उत्तरार्धात खरेदीसाठी नाशिकच्या मालेगावातमुस्लीम महिलांची शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे.
रात्रभर खरेदीसाठी दुकानांवर गर्दी होत असल्याने शहरातील किदवाई रोड, ठिकाणी 'रात्रीचा दिवस' झालेला पाहायला मिळतो.
येत्या शुक्रवारी रात्री चंद्रदर्शन झाल्यास शनिवारी रमजान ईद असणार आहे.
महिला विशेष करुन चपला, कपडे, बांगड्या, ज्वेलरी, नान पाव, कटोरे, शिरखुर्म्याचे साहित्य खरेदी करत आहेत
तर पुरुष वर्ग टोप्या, लुंगी, सुवासिक अत्तर, तयार कपडे आदींना पसंती देत आहे.
खरेदीसाठी मोजकेच दिवस राहिल्याने संध्याकाळ होताच दिवसभर रोजा असलेल्या रोजाधारकांकडून इफ्तारीसाठी फळे आणि खजूर यांची खरेदी केली जाते.
त्यानंतर संपूर्ण रात्र महिलांसह आबालवृद्धांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे.
उपवास सोडण्यासाठी लागणारे खजूर आणि फळांची मोठ्या प्रमाणात शहरात आवक झाली असून त्याची सर्वाधिक विक्री मालेगावात होत आहे.
काही जण चांदरातच्या दिवशी खरेदीसाठी गर्दी करतात.
रमजान ईद म्हटले की मालेगावात खरेदीसाठी झुंबड उडते.