ट्रेन चालवण्यापासून ट्रेन वळवणं ही सर्व कामं ऑटोमॅटिक होतात. पूर्वी लाईट मॅन ट्रेनच्या प्रवासाच्या मार्गाप्रमाणे रेल्वेचे रुळांची रचना बदलायचे पण आता रेल्वे रुळाप्रमाणे ॲडजस्ट होतात.



मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मग ट्रेनच्या ड्रायव्हरच म्हणजेच लोको पायलटचं काम काय, तर ते जाणून घ्या.



लोको पायलटची ड्युटी सुरू झाल्यावर सर्वात आधी इंजिन आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करतो.



ट्रेनच्या इंजिनमध्ये कोणतीही अडचण नाही आणि डिझेल किंवा जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेशा प्रमाणात आहेत, याची खात्री लोको पायलट करतो.



यानंतर, लोको पायलट ट्रेनचा मार्ग इत्यादी आणि मॅन्युअलची माहिती घेतो आणि रेल्वे स्टेशन मास्टरची परवानगी घेतल्यानंतर त्याची ट्रेन पुढे रवाना करतो.



ट्रेनमध्ये स्टेअरिंग नसल्याने ट्रॅक बदलण्याचं काम आपोआप होतं. पण, लोको पायलट नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या दिशानिर्देश, सिग्नल इत्यादींच्या आधारे ट्रेनच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो.



रेल्वेच्या वेगाबाबत अनेक नियम आहेत, हे नियम लोको पायलटला पाळावे लागतात. रेल्वेचा मार्ग निश्चित वेळापत्रकानुसार पूर्ण करणे, ही लोको पायलटची जबाबदारी असते.



रेल्वेवर ट्रॅकवर येणाऱ्या अडथळ्यांचीही काळजीही लोको पायलटला घ्यावी लागते आणि त्यानुसार ट्रेन चालवावी लागते.



लोको पायलटला अनेक अधिकार असतात, पण लोको पायलट मनाला वाटेल तेव्हा किंवा हवी तेव्हा ट्रेन थांबवू शकत नाही.



ट्रेन कोणत्या स्टेशनवर थांबवायची हे लोको पायलट स्वतः ठरवू शकत नाही, त्यासाठी त्याला वेळापत्रक आणि स्टेशन मास्टरचे नियम पाळावे लागतात.