देशात आज कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाली आहे गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1096 नवीन रुग्ण आढळले असून 81 जणांचा मृत्यू झाला आहे काल 1260 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 83 जणांचा मृत्यू झाला आहे शनिवारी दिवसभरात देशात 1 हजार 447 रुग्ण कोरोनामुक्त झाले देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 13 झाली आहे कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 345 झाली आहे देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 93 हजार 773 लोक संसर्गमुक्त झाले आहेत देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 28 हजार 131 जणांना कोरोनाची लागण झाली आहे शनिवारी दिवसभरात 12 लाख 75 हजार 495 डोस देण्यात आले आतापर्यंत कोरोना लसीचे 184 कोटी 66 लाख 86 हजार 260 डोस देण्यात आले आहेत