बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशनचा लवकरच विक्रम वेधा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर नुकताच ह्रतिकनं त्याचा विक्रम वेधा चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर केला. या फोटोला त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझादनं खास कमेंट केली आहे. ह्रतिक रोशननं त्याच्या ऑल इन ब्लॅक लूकमधील फोटो शेअर केले आहेत. ब्लॅक डेनिम आणि ब्लॅक टी-शर्ट अशा लूकमध्ये ह्रतिक दिसत आहे. तसेच त्यानं ब्लॅक सन ग्लासेस घातलेले दिसत आहेत. सबानं त्याच्या या फोटोला कमेंट करत लिहिले, 'Why hello' असं लिहिलं. तसेच सबानं ब्लॅक हार्ट इमोजी देखील शेअर केलं आहे. जायद खाननं कमेंट करत लिहिले, 'किलिंग इट ब्रदर'! ह्रतिकचा फॅमिली फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 20 फेब्रुवारी रोजी ह्रतिक रोशनच्या फॅमिलीसोबत संडे लंच करण्यसाठी सबा त्याच्या घरी गेली होती.