अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) ही बॉलिवूडमधील चर्चेत असणारी जोडी आहे.

मलायका ही 48 वयाची आहे तर अर्जुन 36 वर्षाचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे.

वयात असणाऱ्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते.

काही नेटकरी तिला 'म्हातारी अन् उतावळी', असंही म्हणत होते. या ट्रेलर्सला मलायकानं सडेतोड उत्तर दिलं आहे.

मलायकानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'आपण अशा समाजात राहतो, जो समाज बदलत्या वेळेनुसार प्रगती करत नाहिये.

वयाने मोठा असणाऱ्या व्यक्ती त्याच्यापेक्षा लहान मुलीला डेट करत असेल तर ते या समाजाला मान्य आहे. पण जर एक मुलगी तिच्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या मुलाला डेट करत असेल तर त्या मुलीला लोक म्हातारी आणि उतावळी म्हणतात. मी या लोकांकडे लक्ष देत नाही.'

मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.

998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.