अभिनेत्री मलायका आरोरा सध्या तिच्या 'मूव्हिंग इन विथ मलायका' या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे.
मलायकानं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल या शोमध्ये चर्चा केली.
शोमध्ये फराह खानसोबत चर्चा करताना मलायकानं तिच्या अपघाताबद्दल सांगितलं.
शोमध्ये तिनं सांगितलं की, अपघातानंतर डोळे उघडताच तिला अरबाजचा चेहरा दिसत होता.
कार अपघातानंतरची आठवण मलायकानं सांगितली. ती म्हणाली, 'त्या क्षणानंतर मी खचले होते. मला वाटलं की त्या क्षणी माझी दृष्टी गेली आहे कारण अपघातानंतर दोन तासात मला काहीच दिसत नव्हते.'
'एका काचेचा तुकडा माझ्या डोळ्यात गेला होता. त्यामुळे रक्त येत होतं. त्या क्षणाला मला खरोखरच वाटले की मी जिवंत राहू शकत नाही, मी अरहानला पुन्हा भेटू शकत नाही. मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, शस्त्रक्रिया झाली' असंही मलायकानं सांगितलं.
पुढे मलायकानं सांगितलं. 'जेव्हा शस्त्रक्रियेनंतर मला बाहेर आणण्यात आलं तेव्हा मला डोळे उघडताच पहिला चेहरा मला अरबाजचा दिसला. '
मलायकाचा अपघात 2 एप्रिल रोजी झाला. या अपघातात मलायकाला दुखापत झाली होती.
मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.
1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.