बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते. 'गुड लक जेरी' चित्रपटात दिसलेली जान्हवी आता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7' या चॅट शोच्या भागात दिसली आहे. या एपिसोडमध्ये जान्हवीने कधीकधी एकटेपणा जाणवतो असे सांगितले. जान्हवीने म्हटले आहे की, तिला अशा कोणत्याही व्यक्तीची गरज नाही जो तिच्यासोबत तिचे दु:ख वाटून घेण्यासाठी येईल. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली, “मी अविवाहित आणि आनंदी आहे. कधी कधी मलाही एकटेपणा जाणवतो. जुन्या नात्याबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली 'आजकाल लोकांसाठी जवळीक साधणे खूप सोपे झाले आहे ते त्यांना हवे तेव्हा जवळीक साधू शकतात. या आत्मीयतेमुळे लोक कोणाशीही प्रत्यक्ष संबंध जोडू शकत नाहीत, असे जान्हवी म्हणते. जान्हवी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जान्हवी तिचे नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.