बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या अभिनयानं सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

काही दिवसांपूर्वी आलियाचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट रिलीज झाला होता.

या चित्रपटातील आलिच्या अभिनयाचं अनेकांची कौतुक केलं.

आता लवकरच आलियाचा 'डार्लिंग्स' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या चित्रपटामध्ये आलियानं प्रमुख भूमिका साकारली आहे.

'डार्लिंग्स' चित्रपटामध्ये आलियाच्या पतीची भूमिका अभिनेता विजय वर्मानं साकारली आहे.

हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

चित्रपटाचे संगीत चित्रपट निर्माता-संगीतकार विशाल भारद्वाज यांनी दिले आहे.

चित्रपटाचे गीत हे ज्येष्ठ गीतका गुलजार यांनी लिहिले आहेत.

आलियाचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.