'फॅशन' चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री मुग्धा गोडसे आज (26 जुलै) तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे.



मुग्धाचा जन्म 1986 मध्ये पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.



शिक्षण पूर्ण केल्यानंतर, करिअरच्या सुरुवातीच्या काळात, मुग्धा तिच्या गरजा भागवण्यासाठी आणि इतर खर्चासाठी पेट्रोल पंपावर काम करायची.



या कामासाठी तिला दिवसाला 100 रुपये मिळायचे. यानंतर मुग्धाने जिममध्ये काम करायला सुरुवात केली. या दरम्यान तिने काही स्थानिक सौंदर्य स्पर्धांमध्येही भाग घेतला.



मुग्धा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी स्वप्नांची नगरी मुंबईत आली.



यानंतर तिने एअरटेल, क्लोजअप सारख्या अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केले आणि यासोबतच तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये सहभाग घेत रॅम्प वॉक केला.



मुग्धाने 2008मध्ये मधुर भांडारकरच्या 'फॅशन'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील मुग्धाचा अभिनय चांगलाच पसंत केला गेला होता.



मुग्धाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, ती गेल्या बऱ्याच वर्षांपासून अभिनेता राहुल देवसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे.