किवीच्या सेवनाने आपल्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.
दररोज किवीचा ज्यूस प्यायल्याने तुमच्या शरीराला भरपूर व्हिटॅमिन सी मिळते.
याशिवाय, त्यात कार्बोहायड्रेट, फॉस्फरस, पोटॅशियम, तांबे, व्हिटॅमिन सी, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम सारख्या घटकांचा समावेश आहे. यामुळे तुमचे अनेक आजार दूर राहतात.
दररोज किवीचा ज्यूस प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुरक्षित राहते.
यामध्ये असलेले पोटॅशियम हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारांसाठी अतिशय आरोग्यदायी आहे.
किवीचा ज्यूस रोज प्यायल्याने त्वचेला आणि केसांना खूप फायदा होतो. हे व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्रोत आहे.
व्हिटॅमिन सी ने भरपूर, किवी तुमची पचनशक्ती देखील निरोगी ठेवते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.