रेड मीट म्हणजे लाल मांस खावं की नाही, ते आपल्या आरोग्याला चांगलं की अपायकारक असा प्रश्न अनेकांना पडतो लाल मांस खाल्ल्याने स्ट्रोक येण्याची शक्यता असते असं सांगितलं जातं तसेच लाल मांसाच्या सेवनाचा आणि कोलन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, इस्केमिक हार्ट डिसीज आणि डायबेटिस यांचा संबंध असल्याचं सांगितलं जातंय या सर्वावर अमेरिकेतल्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन या संस्थेने प्रकाश टाकला आहे भरपूर प्रक्रिया न केलेले लाल मांस खाणे आणि स्ट्रोक येणे याचा काही संबंध असल्याचा पुरावे कमी आहेत म्हणजे लाल मांस खाल्ल्याने स्ट्रोक्सचा धोका वाढतो असं म्हटलं जातं पण ते पूर्ण सत्य नाही असं या अभ्यासात स्पष्ट करण्यात आलं आहे तसेच लाल मांसाचं सेवन केल्यानं कोलन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, इस्केमिक हार्ट डिसीज आणि डायबेटिस याचा धोका वाढतो असंही सांगितलं जातं पण या गोष्टींना केवळ लाल मांसाचं सेवन हेच कारणीभूत नाही असं या अभ्यासात म्हटलं आहे. लाल मांसाव्यतिरिक्त स्मोकिंगवरही या अभ्यासात भाष्य करण्यात आलं आहे