मकर संक्रांतीचा उत्सव केवळ दानधर्मासाठी नाही तर, या दिवशी दरवर्षी पतंग उडवण्याची देखील परंपरा आहे. पतंग उडवण्यासाठी प्रयेक जण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो. पण, या दिवशी पतंग का उडवले जाते तुम्हला माहितीये का? मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे एक आख्यायिका आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा केवळ धार्मिकच नाही तर मागे वैज्ञानिक कारण देखील आहे. तसे पाहिले गेले तर पतंग उडवण्यामुळे हात व पायांचा व्यायाम होतो. मकर संक्रांतीचा सण थंडीच्या दिवसात येतो. त्यामुळे या दिवसात पतंग उडवल्याने व्यायाम तर होतोच पण, शरीराला उर्जा देखील मिळते. सूर्यप्रकाशात राहिल्यास व्हिटॅमिन डी देखील मिळते.