देशाची राजधानी दिल्ली येथे अनेक सुंदर आणि ऐतिहासिक वस्तू आहेत. पण, इथे उभारण्यात आलेला लाल किल्ला सर्व वस्तूंपेक्षा वेगळा आहे. ही ती जागा आहे जी भारताच्या सुवर्ण क्षणांची ग्वाही देते. म्हणूनच येथे दर वर्षी देशाचे प्रधानमंत्री स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिरंगा फडकवतात. तुम्हला माहिती आहे का? लाल किल्याचा रंग पहिले लाल नाही तर पांढरा होता. या किल्ल्याचा बहुतांश भाग हा चुना आणि दगडाने बनवण्यात आला आहे. त्यामुळे याचा रंग आधी पंधरा होता. पण, काही वर्षांनी भिंतींना लावलेला चुन आणि दगड खराब होऊ पडू लागले. त्यावेळी इंग्रजांनी याला लाल रंग दिला. त्यानंतर याचे नाव लाल किल्ला ठेवण्यात आले.