एबीपी माझाकडून विविध क्षेत्रातील दिग्गजांना माझा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.

अमेरिकेतील मराठी खासदार श्री ठाणेकर यांना माझा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी अशोक जैन यांचा एबीपी माझाच्या 'माझा सन्मान' पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

मराठीची श्रींमती शब्दश: आपल्या समोर मांडणाऱ्या सुरेश वाघे यांचा सन्मान माझा सन्मान पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला आहे.

अस्सल मुंबईकर असलेल्या शार्दुल ठाकुरचा सन्मान या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला आहे.

जवळपास 14 हजार गावांमध्ये किर्तनाची सेवा पुरवली असे किर्तनकार सत्यपाल महाराज यांचा गौरव करण्यात आला आहे.

ज्यांच्या शीर्षकगीताने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं असे संगीतकार अशोक पत्की यांचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला आहे.

पाच दशकं संगीतविश्वावर आपला ठसा उमटवणारे संगीतकार सुरेश वाडकर यांचा सन्मान करण्यात आला आहे.

हरहुन्नरी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा सन्मान माझा पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात आला आहे.

केदार शिंदे यांना एबीपी माझाच्या पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आलं.