मुंबईच्या जुहू चौपाटीवर गेल्या काही दिवसांपासून जेलीफिश आढळत आहेत.

चौपाटीवर आलेल्या काही जणांना जेलीफिशने दंश केल्याच्या देखील घटना घडल्या आहेत.

पावसाळ्यात मुंबईतील किनारपट्टी परिसरात या जेलीफिश आढळत असतात.

जेलीफिश बूट, पायाला चिकटत असल्याने पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिला जात आहे.

पावसाळ्यात समुद्रावर कोणीही जाऊ नये, असे आवाहन याआधीही महापालिकेने केले होते.

तरीही अनेक जण समुद्रकिनाऱ्यावर जाताना बघायला मिळत आहेत.

पालिकेच्या अग्निशमन दलाच्या लाईफ गार्ड्सकडून खबरदारी घेतली जात आहे.

संपूर्ण जुहू चौपाटीवर लाइफ गार्ड्सची तैनाती बघायला मिळत आहे.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांच्याकडून समुद्रात न जाण्याचं आवाहन केलं जात आहे.

दरम्यान, जुहू चौपाटीवर जेलीफिशसोबतच मोठ्या प्रमाणात तेल तवंग देखील येत असल्याचं दिसतं.