महिंद्रा लवकरच 2-डोअर क्वाड्रिसायकल इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार. या कारचे नाव महिंद्रा अॅटम असून ही एक मिनी इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने ही कार 2020 ऑटो एक्सपोमध्ये सादर केली होती. लॉन्च होण्यापूर्वीच याची बरीच माहिती मीडियामध्ये लीक झाली आहे. ही देशातील पहिली क्वाड्रिसायकल इलेक्ट्रिक कार असणार आहे. महिंद्रा अॅटम एकूण चार प्रकारांमध्ये बाजारात उतरणार आहे.