घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.



औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे 11 कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे.



शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात.



वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि



शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः 16व्या शतकात जीर्णोद्धार केला.



सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून



नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला.



मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे.