बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते.



भाग्यश्रीनंतिच्या चाहत्यांना वजन कमी करण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत.



भाग्यश्रीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे.



व्हिडीओमध्ये ती सांगते की, 'आपल्या शरीरात 70 टक्के पाणी आहे. हे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते.'



पुढे तिनं सांगितलं,'पाण्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या भाज्यांचा डाएटमध्ये समावेश करा. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढतं आणि वजन कमी होते. '



भाग्यश्रीनं पोस्टमध्ये लिहिलं, 'वजन वाढत आहे? वॉटर व्हेजिटेबचा डाएटमध्ये समावेश करा.'



भाज्यांमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढते. तसेच त्यामध्ये डायट्ररी फायबर असतं. ज्यामुळे पचन क्रिया चांगली होते आणि वजन कमी होते.



भाग्यश्री ही 52 वर्षाची आहे. मैने प्यार किया या चित्रपटामुळे भाग्यश्रीला विशेष लोकप्रियता मिळाली.