नागनाथ (नागेश्वर) मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे.



हिंगोली जिल्ह्यात हे आठवे ज्योतिर्लिंग आहे.



आमर्दकपूर (औंढा-नागनाथ, जि. हिंगोली) हे ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे. याचे प्राचीन नाव आमर्दक असे आहे.



ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. यातूनच या स्थलनामाची उत्पत्ती झाली.



औंढा नागनाथ येथील महाशिवरात्रीच्या यात्रेला गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांतून भाविक दर्शनासाठी येतात.



दरवर्षी 26 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत भरणाऱ्या या यात्रेमध्ये प्रचंड प्रमाणात भाविकांचा उत्साह पाहायला मिळतो.



मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे महाशिवरात्री यात्रेवर मोठे निर्बंध होते.



यावर्षीही यात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र, भाविकांसाठी मंदिर उघडे असणार आहे.