ठाणे ते बोरीवली प्रवास आता फक्त 15 मिनिटांत शक्य होणार आहे.

Published by: स्नेहल पावनाक

घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नॅशनल पार्कच्या पोटातून जाणाऱ्या बोगद्याचं काम सुरु आहे.

Published by: स्नेहल पावनाक

'ठाणे-बोरीवली ट्विन टनल' प्रकल्पासाठी वनक्षेत्राची जमीन वापरण्याला मंजुरी मिळाली आहे.

Published by: स्नेहल पावनाक

'ठाणे-बोरीवली ट्विन टनल' प्रकल्पासाठी 35.5644 हेक्टर जमीन वन विभागाने MMRDA ला सोपवली आहे.

Published by: स्नेहल पावनाक

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA कडून आता या प्रकल्पावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

Published by: स्नेहल पावनाक

'ठाणे-बोरीवली ट्विन टनल' प्रकल्पाच्या दुहेरी बोगद्यांतर्गंत 1.85 किमी लांबीचा मार्ग तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे.

Published by: स्नेहल पावनाक

'ठाणे-बोरीवली ट्विन टनल'या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी 14,401 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

Published by: स्नेहल पावनाक

ठाण्याकडील मानपाडा, माजीवाडा, बोरीवडे, येऊर आणि चेने गावाची जमीन यात संपादनासाठी वापरण्यात येणार आहे. तर, बोरीवलीच्या दिशेने मागाठाणे गावाच्या जमिनीवर प्रकल्पाचे काम सुरू आहे.

Published by: स्नेहल पावनाक

संजय गांधी नॅशनल पार्कच्या पोटातून जाणार हा दुहेरी बोगदा प्रकल्प आहे. बोगद्याचे काम तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बोरीवली ते ठाणे दरम्यान 5.75 किमी लांबीचा बोगदा करण्यात येणार आहे.

Published by: स्नेहल पावनाक

दुसऱ्या टप्प्यात ठाणे ते बोरीवली दरम्यान 6.5 किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. तर, तिसऱ्या टप्प्यात वेंटिलेशन सिस्टिमसह अन्य उपकरणांचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Published by: स्नेहल पावनाक


प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर घोडबंदर रोड हे दीड तासांचे अंतर फक्त 15 ते 20 मिनिटांत पार करत ठाण्याहून बोरीवलीपर्यंत पोहोचता येणार आहे.