मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत, लाडक्या बहिणी पैसै कधी येणार या प्रतिक्षेत आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे लाडकी बहिणे योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात आगाऊ जमा करण्यात आले होते.
आता डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न महिलांना पडला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे लवकर मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
आता सरकारकडून योजना आणि इतर कामं लवकर मार्गी लावण्यात येतील.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रत्येकी 7500 रुपये देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला, त्यामुळे त्यांंना बहुमत मिळालं.