महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.

Published by: स्नेहल पावनाक

यानंतर आता नावाजलेल्या अधिकाऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

Published by: स्नेहल पावनाक

देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबरला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रं हाती घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महायुती सरकारनं मोठा निर्णय घेत श्रीकर परदेशी यांची बदली केली आहे.

Published by: स्नेहल पावनाक

श्रीकर परदेशी आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून काम पाहतील.

Published by: स्नेहल पावनाक

यापूर्वी 12 जुलै 2022 रोजी श्रीकर परदेशी यांची तत्कालीन उपमुख्यमंत्र्याचे उपसचिव म्हणून बदली करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते.

Published by: स्नेहल पावनाक

आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

Published by: स्नेहल पावनाक

श्रीकर परदेशी भारतीय प्रशासकीय सेवेतील 2001 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत.

Published by: स्नेहल पावनाक

त्यांनी विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त म्हणून काम केलं आहे. ते नांदेडचे जिल्हाधिकारी होते.

Published by: स्नेहल पावनाक

याशिवाय पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं.

Published by: स्नेहल पावनाक

श्रीकर परदेशी यांनी पंतप्रधान कार्यालयात म्हणजेच पीएमओमध्ये प्रतिनियुक्तीवर काम केलं होतं. तो कालावधी संपल्यानंतर ते राज्यात जून 2021 मध्ये परतले होते.

Published by: स्नेहल पावनाक

आता ते पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या सेवेत रुजू झाले आहेत.

Published by: स्नेहल पावनाक