राज्यात गारठा वाढायला सुरुवात झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे.

अशात नंदुरबारमध्ये तापमनाचा पार कमालीचा घसरला आहे.

नंदुरबारमध्ये डिसेंबरमधील पाच वर्षातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.

सातपुड्याच्या दुर्गम भागातील डाव परिसरात दवबिंदू गोठले.

दवबिंदू गारठल्याने सर्वत्र बर्फाची पांढरी चादर पाहायला मिळत आहे.

दोन-तीन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे.

डाब, देवगोई, मौलीआडी पाडा, डाब, खोबरआंबापाडा, जुनवानी पाडा, देवगोईंपाडा परिसरात जागोजागी गाड्यांच्या टपांवर आणि गवतावर हिमकण साचलेले दिसून आले.

आज तोरणमाळचं तापमान 7 अंश सेल्सिअस इतकं आहे, तर अति दुर्गम भाग डाव परिसरात 4 अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरल्याचं सांगितलं जात आहे.

पुढील काही दिवसात तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.