गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाचा (Rain) जोर कमी झाला होता.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

मात्र, आजपासून पुन्हा राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ (Heavy Rain) घातला आहे.

Image Source: ABP MAJHA

नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.

Image Source: ABP MAJHA

अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे.

Image Source: ABP MAJHA

राज्यातील पुणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यात तुफान पाऊस सुरु आहे.

Image Source: ABP MAJHA

अनेक भागात रस्ते तुंबले आहेत तर काही भागात रस्त्यांवर कंबरेइतकं पाणी साचलं आहे.

Image Source: ABP MAJHA

रायगड जिल्ह्याला आज मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढला आहे.

Image Source: ABP MAJHA

आज हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे.

Image Source: ABP MAJHA

त्यामुळं रायगड जिल्ह्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.

Image Source: ABP MAJHA

या मुसळधार पावसाचा मोठा फटका रोहा आणि सुधागड तालुक्यातील पाली नागोठणे शहरामध्ये बसलेला पाहायला मिळत आहे.

Image Source: ABP MAJHA

रोहा तालुक्यातल्या कुंडलिका आणि सुधागड तालुक्यातल्या पाली विभागातून जाणाऱ्या.

Image Source: ABP MAJHA

अंबा नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे सकल भागात पाणी साचलं आहे.

Image Source: ABP MAJHA