राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा...' अशी महाराष्ट्राची वैभवशाली ओळख आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: google

नंदुरबारपासून ते कोल्हापूरपर्यंत आणि मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत, महाराष्ट्रातील विविधतेमुळे पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतात.

Image Source: google

महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. ज्यामुळे देशातीलच नाही तर परदेशातील सुद्धा पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Image Source: pexles

महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळे व महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी लोक संपूर्ण देशातून महाराष्ट्रात येतात.

Image Source: google

औरंगाबाद ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी मानली जाते.

Image Source: google

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची स्वतःची काही खासियत आहे. मग ते खाण्याचे प्रकार, ऐतिहासिक संदर्भ, निसर्गरम्य किंवा धार्मिक स्थळं असो.

Image Source: google

महाबळेश्वर, लोणावळा, चिखलदरा आणि माथेरान ही महाराष्ट्रातील महत्त्वाची हिल स्टेशन्स आहेत.

Image Source: pexels

पश्चिम महाराष्ट्रातील मराठा साम्राज्याच्या शेकडो डोंगरी किल्ले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील असल्यामुळे ट्रेकिंग, गिर्यारोहण आणि हेरिटेज टूरिझममध्ये स्वारस्य असलेल्या लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.

Image Source: google

याशिवाय सिद्धिविनायक, त्र्यंबकेश्वर, शनी शिंगणापूर, अष्टविनायक, पंढरपूर येथील पांडुरंगाचे मंदिर जी महाराष्ट्राची शान आहे ती बघायलाही पर्यटक महाराष्ट्राला भेट देतात.

Image Source: google