आली आली थंडी, महाग झाली अंडी!

Published by: मनोज जयस्वाल, एबीपी माझा

राज्यात उशिरा का होईना, थंडी दाखल झाली आहे.

एरव्ही नोव्हेंबर महिन्यात थंडीचा जोर वाढत असतो.

मात्र, बदलत्या वातावरणामुळे यंदा उशिरा थंडी राज्यात दाखल झालीय.

पण, थंडी आली की, बाजारात अंड्यांना मागणी वाढते.

त्यामुळे राज्यात अंडी महाग झाली असून मागणीही वाढली आहे.

अंड्यांच्या दारात प्रतिनग जवळपास 1 रुपयानं वाढ झाली आहे.

पूर्वी 30 अंड्यांचा कॅरेट 160 रुपयांना मिळत होता.

मात्र, आता 30 अंड्यांच्या कॅरेटचा दर 190 रुपयांना झाला आहे.

थंडीत आरोग्यासाठी फायदेशीर असणारं अंड खाण्यासाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

आधीच महागाईनं पिचलेल्या सर्वसामान्यांसाठी