या चेंगराचेंगरीत एकूण 9 प्रवासी जखमी झाले आहेत यातील दोन प्रवासी गंभीर जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती.
चेंगराचेंगरीची घटना सकाळी पाऊणे तीन वाजेच्या सुमारास घडली.
दिवाळी आणि छट पूजेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते.
त्यामुळे या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी जमले होते.
वांद्रे ते गोरखपूर रेल्वेतून जाण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती.
दुर्घटनेच्या ठिकाणी पोलीस प्रशासन किंवा रेल्वे प्रशासनाचे कोणतेही अधिकारी उपस्थित नसल्याचे दिसत आहे.
या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.