विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केंद्रबिंदूस्थानी आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम

महिलांच्या समस्या समूजन 1500 रुपये देण्याचे ठरवले असा दावा सत्ताधारी करत आहेत.

महायुती सरकारने जुलै महिन्यात या योजनेला सुरुवात केली.

ऑगस्ट महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळण्यास सुरवात झाली आहे.

महिला मतदारांना पैशांतून आकर्षित करण्यात येत आहे असा दावा विरोधकांकडून केला जात आहे.

सत्तेत आल्यास रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवली जाईल असं महायुतीने म्हटलंय.

तर मविआने 3000 रुपयांची मदत करू असं आश्वासन दिलेलं आहे.

वंचित बहुजन आघाडीनेदेखील महिलांना आर्थिक मदतीचं आश्वासन दिलेलं आहे.

आम्ही सत्तेत आल्यास महिलांना प्रतिमहा 3500 रुपये देऊ.

त्यामुळे महिला नेमकं कोणाच्या पारड्यात मतं टाकणार हे पाहणे महत्वाचे आहे?